महाकैवल्यतेजा सोशल फाउंडेशन आयोजित ✅ ही यात्रा संपन्न झाली आहे (०६ सप्टेंबर २०२६ ते १३ सप्टेंबर २०२६)
श्रीक्षेत्र काशीविश्वनाथ, अयोध्याधाम सह प्रयागराज तिर्थयात्रा
महाकैवल्यतेजा सोशल फाउंडेशन आयोजित काशीविश्वनाथ (बारा ज्योतिर्लिंग), अयोध्याधाम (श्रीराम जन्मभूमी), प्रयागराज त्रिवेणी संगम व चित्रकूट पावन तीर्थयात्रा.
कालावधी८ दिवस / ७ रात्री
यात्रा प्रारंभ०६ सप्टेंबर २०२६
यात्रा सांगता१३ सप्टेंबर २०२६
प्रवास व्यवस्थालक्झरी प्रवास
सवलतीचा सेवा दर
खालचे सिट:₹16,500/-
|वरचे सिट:₹15,500/-
⚡ अनामत नोंदणी: पत्रिका मिळताच ₹8,750/- व आधार कार्ड झेरॉक्स देऊन सिट रिझर्व्ह करा. उर्वरित रक्कम प्रस्थानाच्या १५ दिवस अगोदर जमा करावी.
तीर्थयात्रा छायाचित्रे (Photo Gallery)
6 फोटो
🚩 मुख्य दर्शन छायाचित्र


पावन दर्शन स्थळे
यात्रेतील संपूर्ण तीर्थक्षेत्र व दर्शन तपशील
महाकैवल्यतेजा सोशल फाउंडेशन आयोजित भव्य तीर्थयात्रा. सर्व प्रमुख प्राचीन मंदिरे, पवित्र नद्यांचे संगम, शक्तिपीठे व संतांच्या पावन भूमीचे शिस्तबद्ध दर्शन.
1
श्री काशीविश्वनाथ (वाराणसी)
पावन गंगा तीर व १२ ज्योतिर्लिंगांपैकी १- श्री काशीविश्वनाथ ज्योतिर्लिंग दर्शन व सुवर्ण शिखर दर्शन
- पवित्र गंगा नदी स्नान व मणिकर्णिका घाट दर्शन
- दशाश्वमेध घाटावरील जगप्रसिद्ध भव्य गंगा महाआरती
- कालभैरव मंदिर (काशीचे कोतवाल) व संकटमोचन हनुमान मंदिर
- सारनाथ: भगवान बुद्ध प्रथम उपदेश स्थळ दर्शन
2
श्री अयोध्या धाम (प्रभू श्रीराम जन्मभूमी)
नवनिर्मित भव्य राम मंदिर व सरयू तीर्थ- नवनिर्मित भव्य दिव्य श्रीराम जन्मभूमी मंदिर व रामलल्ला दर्शन
- ऐतिहासिक श्री हनुमान गढी मंदिर दर्शन व आशीर्वाद
- कनक भवन (माता सीता व श्रीराम यांचे सुंदर महाल मंदिर)
- पवित्र सरयू नदी स्नान, संध्या महाआरती व राम की पैडी
- दशरथ महाल व नागेश्वरनाथ प्राचीन शिव मंदिर दर्शन
3
प्रयागराज (पवित्र त्रिवेणी संगम)
गंगा, यमुना व सरस्वती महातीर्थ संगम- पवित्र त्रिवेणी संगम स्नान व नौका विहार
- धार्मिक वेणीदान विधी व पूर्वजांचे पिंडदान सोहळा
- श्री बडे हनुमानजी (विश्रांती अवस्थेतील जागृत मारुती)
- अक्षयवट वृक्ष व पातालपुरी प्राचीन मंदिर दर्शन
- आलोक शंकरी देवी शक्तिपीठ दर्शन
4
चित्रकूट तीर्थ (श्रीराम तपोभूमी)
मंदाकिनी नदी काठ व प्रभू श्रीरामांचे १४ वर्षे वनवास स्थळ- रामघाट: मंदाकिनी नदी स्नान व आरती दर्शन
- कामदगिरी पर्वत ५ कि.मी. पावन प्रदक्षिणा
- हनुमान धारा व स्फटिक शीला (सीताराम चरण दर्शन)
- गुप्त गोदावरी गुंफा व सती अनुसया आश्रम दर्शन
यात्रेकरूंसाठी मार्गदर्शक तत्त्वे
यात्रेचे नियम व अटी
यात्रेचा प्रवास सुरक्षित, शिस्तबद्ध व सुखकर होण्यासाठी कृपया खालील नियमांचे काळजीपूर्वक वाचन करावे.
- प्रवास व भोजन व्यवस्था: वरील प्रवास भाड्यात लक्झरी भाडे, हॉटेल भाडे व भोजनाची व्यवस्था, चहा, नाष्टा व जेवण राहील.
- स्थानिक खर्च व आवश्यक साहित्य: टांगा, रिक्षा, होडी, नाव याचा खर्च स्वतः करावा लागेल. सोबत अंथरूण, पांघरूण, तांब्या, बॅटरी, नेहमीची औषधे, दैनंदिन गरजेच्या वस्तू व आधारकार्ड सोबत घेणे आवश्यक आहे.
- मौल्यवान वस्तू: मौल्यवान दागिने व वस्तू सोबत आणू नयेत.
- सुरक्षितता: यात्रेकरूच्या जीवित व वित्ताहानीस आयोजक जबाबदार राहणार नाहीत. प्रत्येकाने स्वतःच्या साहित्याची काळजी घ्यावी.
- पहिल्या दिवसाचे भोजन: पहिल्या दिवसाचा जेवणाचा डब्बा सोबत घरून आणावा.
- तिकीट रद्द करण्याचे धोरण: काही कारणास्तव यात्रेकरूने तिकीट कॅन्सल / रद्द केल्यास जमा केलेले पैसे परत मिळणार नाहीत.
- सिट व्यवस्था: बदली सीट चालणार नाही व जवळ-जवळ सिट पाहिजे असा आग्रह धरू नये.
- शिस्त व नियमांचे पालन: यात्रा व्यवस्थापक व आयोजकांच्या सर्व सूचना व नियमांचे काटेकोर पालन करावे लागेल.
महत्त्वाची नोंदणी सूचना: यात्रेकरूंनी पत्रिका मिळताच ₹8,750/- रू. व आधार कार्ड झेरॉक्स देऊन आपले सिट रिझर्व्ह करावे व उर्वरित रक्कम यात्रा निघण्याच्या १५ दिवस अगोदर जमा करावी.
पुढील वर्षाचे नियोजन
पुढील आयोजनाची पूर्वसूचना व चौकशी नोंदणी
सदर यात्रा संपन्न झाली असून पुढील वर्षाच्या नियोजनासाठी पूर्वनोंदणी सुरू आहे. खाली माहिती भरा, तारखा घोषित होताच प्राधान्याने कळवले जाईल.

