भक्ती, शिस्त आणि सुरक्षिततेचा पावन संगम

तीर्थक्षेत्र दर्शन यात्रा उपक्रम

ह. भ. प. ज्ञानेश्वर माऊलींच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नागरिक, भाविक आणि कुटुंबांसाठी आयोजित केलेल्या आदर्श धार्मिक यात्रा.

🍲 घरगुती सात्त्विक भोजन🏨 आरामदायी व सुरक्षित निवास👴 ज्येष्ठांची विशेष वैद्यकीय काळजी🚩 दैनंदिन भजन-कीर्तन सत्संग
आगामी पॅकेजेस

आयोजित तीर्थक्षेत्र यात्रा पॅकेजेस

श्रीक्षेत्र काशीविश्वनाथ, अयोध्याधाम सह प्रयागराज तिर्थयात्रा८ दिवस / ७ रात्रीसंपन्न यात्रा

श्रीक्षेत्र काशीविश्वनाथ, अयोध्याधाम सह प्रयागराज तिर्थयात्रा

महाकैवल्यतेजा सोशल फाउंडेशन आयोजित काशीविश्वनाथ (बारा ज्योतिर्लिंग), अयोध्याधाम (श्रीराम जन्मभूमी), प्रयागराज त्रिवेणी संगम व चित्रकूट पावन तीर्थयात्रा.

स्थळे:काशीविश्वनाथ, अयोध्याधाम, प्रयागराज, चित्रकूट
प्रवास:लक्झरी बस प्रवास, हॉटेल निवास व दर्जेदार भोजन व्यवस्था
कालावधी:०६ सप्टेंबर २०२६ ते १३ सप्टेंबर २०२६
खालचे सिट₹16,500/-
वरचे सिट₹15,500/-
रामेश्वर धाम, तिरुपती बालाजी तीर्थयात्रा१२ दिवस / ११ रात्रीनोंदणी सुरू

रामेश्वर धाम, तिरुपती बालाजी तीर्थयात्रा

महाकैवल्यतेजा सोशल फाउंडेशन आयोजित रामेश्वर धाम, तिरुपती बालाजी, श्री मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग सह दक्षिण भारत दिव्य तीर्थयात्रा. स्लिपर कोच ट्रॅव्हल्स, हॉटेल निवास व घरगुती सात्त्विक भोजन व्यवस्था.

स्थळे:तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर, श्रीशैल्य, महानंदी, कालहस्ती, तिरुपती बालाजी, शिवकांची, विष्णूकांची, रामेश्वर, कन्याकुमारी, मदुराई, धनुष्कोडी, पद्मनाभस्वामी, म्हैसूर, गोकर्ण, कोल्हापूर, आदमापूर
प्रवास:स्लिपर कोच ट्रॅव्हल्स, हॉटेल निवास व दर्जेदार भोजन व्यवस्था
कालावधी:१८ जानेवारी २०२७ ते २९ जानेवारी २०२७
खालचे सिट₹22,499/-
वरचे सिट₹21,499/-
सविस्तर माहिती →
श्री ब्रजधाम यात्रा8 दिवस / 7 रात्रीनोंदणी सुरू

श्री ब्रजधाम यात्रा

महाकैवल्यतेजा सोशल फाउंडेशन आयोजित श्री ब्रजधाम यात्रा. प्रारंभ: नोव्हेंबर २०२६ | सांगता: नोव्हेंबर २०२६. ०८ दिवस कालावधी. महाकालेश्वर व ओंकारेश्वर २ पावन ज्योतिर्लिंग, मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी, वृंदावन बांके बिहारी, गोवर्धन परिक्रमा, बरसाना राधाराणी धाम, गोकुळ व आग्रा दर्शन.

स्थळे:उज्जैन (महाकालेश्वर), ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग, मथुरा, वृंदावन, बरसाना, गोवर्धन, गोकुळ, आग्रा
प्रवास:स्लिपर कोच लक्झरी ट्रॅव्हल्स
कालावधी:नोव्हेंबर २०२६ ते नोव्हेंबर २०२६
खालचे सिट₹16,499/-
वरचे सिट₹15,499/-
सविस्तर माहिती →
वारकरी शिस्त व सोयी

यात्रेतील सर्वसमावेशक आदर्श सुविधा

🍲

शुद्ध सात्त्विक भोजन

महाराष्ट्राच्या घरगुती चवीचे तिन्ही वेळचे ताजे जेवण, उपवासाची स्वतंत्र सोय आणि चहा-नाश्ता.

🏨

सुरक्षित व स्वच्छ निवास

कौटुंबिक वातावरणातील दर्जेदार हॉटेल्स / भक्तनिवास, स्वतंत्र खोल्या व गरम पाण्याची सोय.

🩺

वैद्यकीय काळजी व प्रथमोपचार

सोबत प्रथमोपचार पेटी, डॉक्टर ऑन कॉल आणि ज्येष्ठ नागरिकांची नियमित आरोग्य तपासणी.

🚩

सत्संग व आध्यात्मिक सहवास

दररोज सकाळी काकड आरती, हरिपाठ, ज्ञानेश्वर माऊलींचे प्रवचन आणि विठ्ठल नामाचा गजर.

यात्रेकरूंसाठी नियमावली

तीर्थक्षेत्र यात्रेचे नियम व अटी

सर्व भाविक यात्रेकरूंच्या सोयीसाठी, सुरक्षेसाठी आणि प्रवासाच्या शिस्तीसाठी खालील नियमांचे पालन बंधनकारक राहील.

  1. प्रवास व भोजन व्यवस्था: वरील प्रवास भाड्यात लक्झरी भाडे, हॉटेल भाडे व भोजनाची व्यवस्था, चहा, नाष्टा व जेवण राहील.
  2. स्थानिक खर्च व साहित्य: टांगा, रिक्षा, होडी, नाव याचा खर्च स्वतः करावा लागेल. सोबत अंथरूण, पांघरूण, तांब्या, बॅटरी, नेहमीचे औषधी दैनंदिन गरजेच्या वस्तू, आधारकार्ड सोबत घेणे आवश्यक.
  3. मौल्यवान वस्तू: मौल्यवान वस्तू व दागिने सोबत घेऊ नयेत.
  4. सुरक्षितता: यात्रेकरूच्या जीवित व वित्ताहानीस आयोजक जबाबदार राहणार नाहीत.
  5. पहिल्या दिवसाचे जेवण: पहिल्या दिवसाचा जेवणाचा डब्बा घरून सोबत आणावा.
  6. तिकीट रद्द धोरण: काही कारणास्तव यात्रेकरूने तिकीट कॅन्सल / रद्द केल्यास पैसे परत मिळणार नाहीत.
  7. सिट आरक्षण: बदली सीट चालणार नाही व जवळ-जवळ सिट पाहिजे असा आग्रह धरू नये.
  8. आयोजकांचे नियम: यात्रा प्रमुख व आयोजकांच्या नियमांचे काटेकोर पालन करावे लागेल.
⚡
टिप / आरक्षण अनामत: यात्रेकरूंनी पत्रिका मिळताच ₹८,७५०/- रू. व आधार कार्ड झेरॉक्स देवून आपले सिट रिझर्व करावे व उर्वरित रक्कम यात्रा निघण्याच्या १५ दिवस अगोदर जमा करावी.
थेट नोंदणी अर्ज

तीर्थयात्रा ऑनलाइन नोंदणी व बुकिंग

आपल्या पसंतीच्या तीर्थक्षेत्र यात्रेसाठी खालील फॉर्म भरा. आमचा यात्रा कक्ष २४ तासांत आपल्याला संपर्क करेल.

+91
निवडलेली सिट संख्या व प्रकार:खालचे सिट • 1 व्यक्ती
एकूण प्रवास शुल्क:₹22,499/-
अनामत रक्कम:₹10,000/-

थेट यात्रा सहाय्य संपर्क कक्ष

आपल्या आवडीच्या तीर्थयात्रेचे बुकिंग किंवा अधिक माहितीसाठी थेट संपर्क साधा: