महाकैवल्यतेजा सोशल फाउंडेशन आयोजित नोंदणी सुरू आहे
श्री ब्रजधाम यात्रा
महाकैवल्यतेजा सोशल फाउंडेशन आयोजित श्री ब्रजधाम यात्रा. प्रारंभ: नोव्हेंबर २०२६ | सांगता: नोव्हेंबर २०२६. ०८ दिवस कालावधी. महाकालेश्वर व ओंकारेश्वर २ पावन ज्योतिर्लिंग, मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी, वृंदावन बांके बिहारी, गोवर्धन परिक्रमा, बरसाना राधाराणी धाम, गोकुळ व आग्रा दर्शन.
कालावधी8 दिवस / 7 रात्री
यात्रा प्रारंभनोव्हेंबर २०२६
यात्रा सांगतानोव्हेंबर २०२६
प्रवास व्यवस्थालक्झरी प्रवास
सवलतीचा सेवा दर
खालचे सिट:₹16,499/-
|वरचे सिट:₹15,499/-
⚡ अनामत नोंदणी: पत्रिका मिळताच ₹5,000/- व आधार कार्ड झेरॉक्स देऊन सिट रिझर्व्ह करा. उर्वरित रक्कम प्रस्थानाच्या १५ दिवस अगोदर जमा करावी.
तीर्थयात्रा छायाचित्रे (Photo Gallery)
6 फोटो
🚩 मुख्य दर्शन छायाचित्र


पावन दर्शन स्थळे
यात्रेतील संपूर्ण तीर्थक्षेत्र व दर्शन तपशील
महाकैवल्यतेजा सोशल फाउंडेशन आयोजित भव्य तीर्थयात्रा. सर्व प्रमुख प्राचीन मंदिरे, पवित्र नद्यांचे संगम, शक्तिपीठे व संतांच्या पावन भूमीचे शिस्तबद्ध दर्शन.
1
उज्जैन (महाकालेश्वर ज्योतिर्लिंग)
१२ ज्योतिर्लिंगांपैकी १ व महाकाल कॉरिडॉर- श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग पावन दर्शन
- भव्य व दिव्य महाकाल कॉरिडॉर पाहणे
- श्री कालभैरवनाथ मंदिर व श्री हरिसिद्धी माता मंदिर (शक्तिपीठ)
- श्री चिंतामणी गणेश मंदिर व गढकालिका माता मंदिर दर्शन
- पवित्र श्री राम घाट व राम गोपाल मंदिर दर्शन
2
बरसाना व गोवर्धन (श्री राधाराणी धाम)
राधाराणी जन्मस्थान व गोवर्धन पर्वत लीला- बरसाना: श्री राधाराणी जन्मस्थान व श्री राधाराणी मंदिर
- कोकिला वन व रंग महल दर्शन
- पूज्य श्री रमेश बाबांच्या सव्वा लक्ष गायींचे पावन गोमाता दर्शन
- गोवर्धन: श्रीकृष्णाने करंगळीवर गोवर्धन पर्वत धारण केलेले ठिकाण
- गोवर्धन मुखारविंद दर्शन, मानसी गंगा व दान पाटी
- पवित्र श्री राधा कुंड व शाम कुंड दर्शन
3
वृंदावन धाम (बांके बिहारी व पावन लीला स्थळे)
प्रेम मंदिर, निधिवन व १२ किमी पायी परिक्रमा- ठाकूर श्री बांके बिहारी मंदिर व राधावल्लभ मंदिर दर्शन
- श्री राधा दामोदर मंदिर (४ प्रदक्षिणा केल्यावर गोवर्धन परिक्रमेचे पुण्य फळ)
- सेवाकुंज निधिवन (रासक्रीडा स्थान), प्रियाकांतजू मंदिर, कालिया डोह
- गोपेश्वर महादेव मंदिर व श्री रंगजी मंदिर (१२०० किलो सोन्याचा खांब)
- श्री कात्यायनी माता मंदिर, शिस महल व श्री पागल बाबा मंदिर
- इस्कॉन (अंग्रेज) मंदिर व जगप्रसिद्ध भव्य प्रेम मंदिर
- सुप्रसिद्ध वैष्णवी देवी मंदिर, पवित्र यमुना स्नान व केशी घाट महाआरती
- पूज्य गौरी गोपाळ आश्रम दर्शन व १२ कि.मी. वृंदावन पायी परिक्रमा
4
मथुरा व गोकुळ (श्रीकृष्ण जन्मभूमी व बाललीला)
कारागृह दर्शन, ८४ खांब वाडा व रमणरेती- मथुरा: भगवान श्रीकृष्ण जन्मभूमी व श्री राधाकृष्ण मंदिर
- ऐतिहासिक श्री वासुदेव देवकी बंदी शाळा (कारागृह) दर्शन
- श्री द्वारकाधीश मंदिर दर्शन
- गोकुळ: ब्रम्हांड घाट (बालकृष्णाने माती खाऊन ब्रह्मांड दाखवलेला घाट)
- ८४ खांब नंदबाबाचा ऐतिहासिक वाडा
- रमणरेती (बाळकृष्णाने रांगलेले व धूळ अंगाला लावलेले पावन स्थान)
5
ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग व आग्रा दर्शन
नर्मदा तीरावरील ज्योतिर्लिंग व जगप्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू- ओंकारेश्वर: पवित्र नर्मदा काठावरील ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन
- आग्रा: जगातील सात आश्चर्यांपैकी एक जगप्रसिद्ध ताजमहाल पाहणे
- आग्रा: ऐतिहासिक मुघलकालीन भव्य आग्रा लाल किल्ला पाहणे
यात्रेकरूंसाठी मार्गदर्शक तत्त्वे
यात्रेचे नियम व अटी
यात्रेचा प्रवास सुरक्षित, शिस्तबद्ध व सुखकर होण्यासाठी कृपया खालील नियमांचे काळजीपूर्वक वाचन करावे.
- प्रवास व भोजन व्यवस्था: वरील प्रवास भाड्यात लक्झरी भाडे, हॉटेल भाडे व भोजनाची व्यवस्था, चहा, नाष्टा व जेवण राहील.
- स्थानिक खर्च व आवश्यक साहित्य: टांगा, रिक्षा, होडी, नाव याचा खर्च स्वतः करावा लागेल. सोबत अंथरूण, पांघरूण, तांब्या, बॅटरी, नेहमीची औषधे, दैनंदिन गरजेच्या वस्तू व आधारकार्ड सोबत घेणे आवश्यक आहे.
- मौल्यवान वस्तू: मौल्यवान दागिने व वस्तू सोबत आणू नयेत.
- सुरक्षितता: यात्रेकरूच्या जीवित व वित्ताहानीस आयोजक जबाबदार राहणार नाहीत. प्रत्येकाने स्वतःच्या साहित्याची काळजी घ्यावी.
- पहिल्या दिवसाचे भोजन: पहिल्या दिवसाचा जेवणाचा डब्बा सोबत घरून आणावा.
- तिकीट रद्द करण्याचे धोरण: काही कारणास्तव यात्रेकरूने तिकीट कॅन्सल / रद्द केल्यास जमा केलेले पैसे परत मिळणार नाहीत.
- सिट व्यवस्था: बदली सीट चालणार नाही व जवळ-जवळ सिट पाहिजे असा आग्रह धरू नये.
- शिस्त व नियमांचे पालन: यात्रा व्यवस्थापक व आयोजकांच्या सर्व सूचना व नियमांचे काटेकोर पालन करावे लागेल.
महत्त्वाची नोंदणी सूचना: यात्रेकरूंनी पत्रिका मिळताच ₹5,000/- रू. व आधार कार्ड झेरॉक्स देऊन आपले सिट रिझर्व्ह करावे व उर्वरित रक्कम यात्रा निघण्याच्या १५ दिवस अगोदर जमा करावी.
सिट आरक्षण
यात्रेसाठी ऑनलाइन सिट बुकिंग करा
श्री ब्रजधाम यात्रा साठी आपली माहिती नोंदवा. नोंदणी होताच आमचे प्रतिनिधी आपल्याला लगेच संपर्क करतील.

