महाकैवल्यतेजा सोशल फाउंडेशन आयोजित नोंदणी सुरू आहे

रामेश्वर धाम, तिरुपती बालाजी तीर्थयात्रा

महाकैवल्यतेजा सोशल फाउंडेशन आयोजित रामेश्वर धाम, तिरुपती बालाजी, श्री मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग सह दक्षिण भारत दिव्य तीर्थयात्रा. स्लिपर कोच ट्रॅव्हल्स, हॉटेल निवास व घरगुती सात्त्विक भोजन व्यवस्था.

कालावधी१२ दिवस / ११ रात्री
यात्रा प्रारंभ१८ जानेवारी २०२७
यात्रा सांगता२९ जानेवारी २०२७
प्रवास व्यवस्थालक्झरी प्रवास
सवलतीचा सेवा दर
खालचे सिट:₹22,499/-
|
वरचे सिट:₹21,499/-
⚡ अनामत नोंदणी: पत्रिका मिळताच ₹10,000/- व आधार कार्ड झेरॉक्स देऊन सिट रिझर्व्ह करा. उर्वरित रक्कम प्रस्थानाच्या १५ दिवस अगोदर जमा करावी.
थेट फोनवर बोला (8390665518)

यात्रेतील प्रमुख वैशिष्ट्ये व अनुभव

🕉️ धार्मिक विधी व अनुभव:
दर्शनस्नानआरतीपिंडदानवेणीदान
🚌 प्रवास व सुविधा:
लक्झरी प्रवासहॉटेल निवाससात्त्विक भोजननाष्टाचहा
पावन दर्शन स्थळे

यात्रेतील संपूर्ण तीर्थक्षेत्र व दर्शन तपशील

महाकैवल्यतेजा सोशल फाउंडेशन आयोजित भव्य तीर्थयात्रा. सर्व प्रमुख प्राचीन मंदिरे, पवित्र नद्यांचे संगम, शक्तिपीठे व संतांच्या पावन भूमीचे शिस्तबद्ध दर्शन.

1

महाराष्ट्र राज्य (पुण्यभूमी दर्शन)

कुलस्वामिनी, दत्त संप्रदाय व संत समाधी दर्शन
  • तुळजापूर: श्री तुळजाभवानी माता दर्शन
  • अक्कलकोट: श्री स्वामी समर्थ महाराज समाधी मंदिर दर्शन
  • कोल्हापूर: श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिर दर्शन
  • कोल्हापूर: श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर दर्शन
  • आदमापूर: सद्गुरू श्री बाळूमामा समाधी मंदिर दर्शन
2

कर्नाटक राज्य (दत्तपीठ व ऐतिहासिक मंदिरे)

गाणगापूर, म्हैसूर पॅलेस व गोकर्ण महाबळेश्वर
  • गाणगापूर: श्री दत्त गुरू दर्शन व निर्गुण पादुका दर्शन
  • म्हैसूर: ऐतिहासिक राजवाडा व भव्य सिटी पॅलेस पाहणे
  • वृंदावन गार्डन: जगप्रसिद्ध गार्डन व कारंजे पाहणे
  • श्रीरंगपट्टण: श्रीरंग भगवान विष्णूचे भव्य मंदिर दर्शन
  • चामुंडी हिल्स: महिषासूर मर्दिनी चामुंडा देवी दर्शन
  • गोकर्ण: मुरुडेश्वर मंदिर, महाबळेश्वर मंदिर (रावणाने स्थापित आत्मलिंग) व समुद्र स्नान
3

आंध्रप्रदेश (श्रीमंत व्यंकटेश बालाजी व मल्लिकार्जुन)

१२ ज्योतिर्लिंगांपैकी १ व तिरुमला महातीर्थ
  • श्रीशैल्य: श्री मल्लिकार्जुन १२ ज्योतिर्लिंगांपैकी १ पावन ज्योतिर्लिंग दर्शन व पाताळगंगा स्नान
  • महानंदी: श्री भगवान शंकराचे दर्शन व जगप्रसिद्ध पाषाण नंदी
  • कालहस्ती: श्री कालहस्तीश्वर (वायू लिंग) महादर्शन
  • तिरुपती: श्री जगप्रसिद्ध श्रीमंत व्यंकटेश बालाजीचे दर्शन व सोन्याचे मंदिर
  • तिरूमल्ला: श्री गोविंदराज स्वामी मंदिर दर्शन
  • पद्मावती: महालक्ष्मी माता पद्मावती मंदिर दर्शन
4

तामिळनाडू (रामेश्वरम धाम व कन्याकुमारी)

श्रीरामस्थापित शिवलिंग, २१ कुंडस्नान व सागर संगम
  • शिवकांची: श्री एकांबरेश्वराचे अतिभव्य मंदिर दर्शन
  • विष्णूकांची: श्री कामाक्षी देवी व वरदराज मंदिर दर्शन
  • रामेश्वर: प्रत्यक्ष भगवान रामचंद्रप्रभूने स्थापन केलेले शिवलिंग भव्य दर्शन व २१ कुंड स्नान
  • धनुष्कोडी: ऐतिहासिक पावन रामसेतू प्रारंभ स्थळ
  • कन्याकुमारी: कन्याकुमारी देवीचे दर्शन, स्वामी विवेकानंद स्मारक व त्रिवेणी संगम (सूर्योदय/सूर्यास्त)
  • मदुराई: जगप्रसिद्ध माता मीनाक्षी देवीचे अतिभव्य मंदिर दर्शन
5

केरळ राज्य (अनंत पद्मनाभस्वामी)

श्रीमंत विष्णू तीर्थ व स्थापत्य दर्शन
  • तिरुवनंतपुरम: श्री पद्मनाभस्वामी मंदिर दर्शन
  • भव्य दाक्षिणात्य गोपूरम व स्थापत्य कला पाहणे
  • पवित्र परिसर व पारंपरिक दर्शन सोहळा
यात्रेकरूंसाठी मार्गदर्शक तत्त्वे

यात्रेचे नियम व अटी

यात्रेचा प्रवास सुरक्षित, शिस्तबद्ध व सुखकर होण्यासाठी कृपया खालील नियमांचे काळजीपूर्वक वाचन करावे.

  1. प्रवास व भोजन व्यवस्था: वरील प्रवास भाड्यात लक्झरी भाडे, हॉटेल भाडे व भोजनाची व्यवस्था, चहा, नाष्टा व जेवण राहील.
  2. स्थानिक खर्च व आवश्यक साहित्य: टांगा, रिक्षा, होडी, नाव याचा खर्च स्वतः करावा लागेल. सोबत अंथरूण, पांघरूण, तांब्या, बॅटरी, नेहमीची औषधे, दैनंदिन गरजेच्या वस्तू व आधारकार्ड सोबत घेणे आवश्यक आहे.
  3. मौल्यवान वस्तू: मौल्यवान दागिने व वस्तू सोबत आणू नयेत.
  4. सुरक्षितता: यात्रेकरूच्या जीवित व वित्ताहानीस आयोजक जबाबदार राहणार नाहीत. प्रत्येकाने स्वतःच्या साहित्याची काळजी घ्यावी.
  5. पहिल्या दिवसाचे भोजन: पहिल्या दिवसाचा जेवणाचा डब्बा सोबत घरून आणावा.
  6. तिकीट रद्द करण्याचे धोरण: काही कारणास्तव यात्रेकरूने तिकीट कॅन्सल / रद्द केल्यास जमा केलेले पैसे परत मिळणार नाहीत.
  7. सिट व्यवस्था: बदली सीट चालणार नाही व जवळ-जवळ सिट पाहिजे असा आग्रह धरू नये.
  8. शिस्त व नियमांचे पालन: यात्रा व्यवस्थापक व आयोजकांच्या सर्व सूचना व नियमांचे काटेकोर पालन करावे लागेल.
महत्त्वाची नोंदणी सूचना: यात्रेकरूंनी पत्रिका मिळताच ₹10,000/- रू. व आधार कार्ड झेरॉक्स देऊन आपले सिट रिझर्व्ह करावे व उर्वरित रक्कम यात्रा निघण्याच्या १५ दिवस अगोदर जमा करावी.
सिट आरक्षण

यात्रेसाठी ऑनलाइन सिट बुकिंग करा

रामेश्वर धाम, तिरुपती बालाजी तीर्थयात्रा साठी आपली माहिती नोंदवा. नोंदणी होताच आमचे प्रतिनिधी आपल्याला लगेच संपर्क करतील.

+91
निवडलेली सिट संख्या व प्रकार:खालचे सिट • 1 व्यक्ती
एकूण प्रवास शुल्क:₹22,499/-
अनामत रक्कम:₹10,000/-